Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पूरपरिस्थिती आटोक्यात आली असती...!कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील . नद्यांच जाळ नदीजोड प्रकल्पाचे कामे सुरू झाली असती तर ....



बीड //आज महाराष्ट्राला समृध्दी महामार्गापेक्षा नदीजोड प्रकल्पाची जास्त गरज आहे....
नंदूरबारला पूर आला,  गडचिरोलीला पूर आला,  इकडे नाशिकला पूर आला,  अन् सांगली सातारा तर पूर्ण पाण्यात गेला अन इकडे आमचा मराठवाडा मात्र दुष्काळात...
किती लांब आहे हो मराठवाडा या नद्यांपासून?  नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग होऊ शकतो तर या नद्यांच जाळ नाही का होऊ शकत.... मराठवाडय़ातील प्रत्येक आमदार खासदारांनी जर ही मागणी लावून धरली तर हे सहज शक्य ही आहे...

मराठवाड्यात सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. त्यामुळे मराठवाड्यासाठी इतर प्रदेशातील म्हणजे विपुलतेच्या खोऱ्यातून पाणी वळविण्यासाठी प्रवाही वळण योजना, उपसा वळण योजनांचे (नदी जोड प्रकल्प) नियोजन करणे आज काळाची गरज आहे .
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्प   दमनगंगेचे पाणी गोदावरीकडे वळविण्यात येणार होते . या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे गोदावरी नदीला भरपूर पाणी , जायकवाडी धरणात जलसाठा वाढण्यास सरकार असे उदासीन का?

सतत दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यात इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाच्या दिशेने शासनाने या योजनेचा प्राधान्यक्रम, मापदंडाचा अहवाल तयार करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाची स्थापना केली होती .

नदी जोड प्रकल्प राबवून पावसाचे वाया जाणारे पाणी कसे वाचविता येईल, यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. अखेर १३ आॅगस्ट रोजी हा अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता त्याला आज रोजी एक वर्ष उलटून गेले तरी सरकार झोपेतच आहे .