Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक !अरुण जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग..




दिल्ली // भाजपचे वरिष्ठ नेता आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती सध्या अतंत्य चिंताजनक आहे. एम्स रुग्णालयाने त्यांची नाजूक प्रकृती पाहून त्यांना वेंटिलेटरवरुन काढून ईसीएमओ म्हणजेच एक्सट्रायकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशनवर शिफ्ट करण्यात आले आहे. परंतू नुकत्याच आलेल्या माहितीनुसार जेटली उपचार घेत असलेल्या दिल्लीतील प्रसिद्ध हॉस्पिटल एम्समध्ये आगलागल्याची घटना घडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली . एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझविण्याचं काम सुरु आहे. 
शॉक सर्किटमुळे एम्स हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाचे नेते अरुण जेटली यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जातात त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. सध्याच्या माहितीनुसार अरुण जेटली ज्या मजल्यावर आहेत तिथे ही आग पोहचली नाही. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.