Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! बीड पोलिस दलात खळबळ ;तिहेरी हत्याकांड प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक आणि जमादार यांना तडकाफडकी निलंबीत



बीड// बीडमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एका महिला पोलिस उपनिरीक्षकास आणि एका जमादाराला तडकाफडकी निलंबीत केले आहे. त्यामुळे बीड पोलिस दलात खळबळ उडाली आहे.कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शहरातील अकार्यक्षम पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चांगलाच झटका दिला आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड आणि जमादार वंजारे अशी निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही बीड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. बीडमध्ये शेतजमिनीच्या वादातून तिघांचा खून झाल्याची घटना ताजी आहे. शेतजमिनीच्या वादातुन जिवीताला धोका असल्याची तक्रार संबंधिताने पोलिसांकडे दिली होती. मात्र, त्यावर वेळीच कारवाई करण्यात आली नाही आणि ज्यांच्याविरूध्द तक्रारी अर्ज करण्यात आला होता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह आणि जमादारास पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या या निलंबन कारवाईमुळे बीड पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळात देखील अकार्यक्षम पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल हे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर हर्ष पोद्दार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांची भुमिका स्पष्ट केली होती. तहेरी हत्याकांड प्रकरण घडण्यापुर्वी वेळीच कारवाई केली असती तर अनर्थ टळला असता.