Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांच्या तहानेची चिंता प्रशासनाला का नाही, टंचाईग्रस्त परिस्थितीचा अभ्यास प्रशासकीय पातळीवर का? केला गेला नाही ?यासाठी ३१ जुलै रोजी अवमान याचीका दाखल करणार –चंदुलाल बियाणी




परळी // परळी शहराच्या पाण्याचा संघर्ष प्रचंड तीव्र झाला आहे. शहरवासीयांच्या तहानेची चिंता प्रशासनाला का नाही, टंचाईग्रस्त परिस्थितीचा वास्तवदर्शी अभ्यासच प्रशासकीय पातळीवर केला गेला किंवा नाही? असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण टंचाईचे स्वरूप काय? पाण्याची गरज किती? आणि पाणी उपलब्ध कोठून करायचे? याबाबतची स्थिती प्रशासनालाच अवगत असल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर निर्णय घ्यावा असे आदेश कोर्टाने दिले होते .
परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण धरणातील पाणीसाठा संपल्याने शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचीका दाखल केली होती. या याचिकेवर स्पष्ट सुनावणी देत परळी शहराला कोठून पाणीपुरवठा करायचा याचा निर्णय जिल्हाधिकारीच घेवू असा निर्वाळा दिला होता. परंतू अद्यापही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नसल्याने हा कोर्टाच्या निर्णयाचा अवमान असुन,
३१ जुन रोजी औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट निकाल देवून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येत्या ३१ जुलै रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याबद्दल याचीका दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे.