Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पत्रकार नागेश औताडे यांनी गरजुंना मदत व विविध सामाजिक उपक्रम राबवून ते वाढदिवस साजरा केला.




अंबाजोगाई // येथील योगेश्वरी दर्शनचे संपादक नागेश औताडे यांच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य मतीमंद मुलींच्या निवासी विद्यालयातील विद्यार्थीनींना खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले.विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून मित्रमंडळाकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. दिवसभर शहरातील सर्वपक्षीय नेते,विविध संस्था व मान्यवरांकडून
वाढदिवसानिमित्त औताडे यांचे सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.


अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी दर्शन चॅनलचे संपादक नागेश औताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळणी व खाऊ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ लिपीक एल.एम.लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिध्द मधूमेह तज्ञ डॉ. अतुल शिंदे,बालासाहेब फड यांची उपस्थिती होती. यावेळी नागेश औताडे यांच्या वतीने मतीमंद मुलींना खेळण्यासाठी खेळणी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. शाळेच्या वतीने नागेश औताडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून अभिष्ठचिंतन करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ.अतुल शिंदे यांनी सांगितले की, पत्रकारितेच्या माध्यमातून काम करताना नागेश औताडे यांनी आपली स्वता:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य ते करीत आहेत.गेल्या चार वर्षांपासुन आपल्या वाढदिवसानिमित्त गरजुंना मदत व विविध सामाजिक उपक्रम राबवून ते वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला डॉ.अतुल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना एल.एम. लोखंडे यांनी सांगितले की,नागेश औताडे हे प्रतिकुल परिस्थितीतून पुढे आलेले व्यक्तीमत्व आहे.त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल कौतुक करून लोखंडे यांनी औताडे यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्तव्य मतीमंद मुलींचे निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता चौधरी यांनी केले.तर सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मिना लोमटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश डाके,नंदकुमार पिंपरे, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.