Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! परळी-पिंपळा रखडलेल्या कामातील कन्हेरवाडी पर्यंतचा रस्ता महिनाभरात पुर्ण करू ; जनतेला झालेल्या त्रासाबद्दल ना पंकजाताई मुंडेनी व्यक्त केली खंत.


परळी //  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज परळी ते पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली. कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे   रस्त्याच्या कामात दिरंगाई झाल्याने जनतेला जो त्रास होत आहे, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तथापि आता हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून येत्या महिन्याभरात कन्हेरवाडी पर्यंतचा रस्ता पुर्ण होईल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

   परळी ते पिंपळा हा अठरा किमी लांबीचा रस्ता ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाला. या रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिक व रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल मध्यंतरी त्यांनी कंत्राटदाराला तंबीही दिली होती. कामाच्या दिरंगाई मुळे कंत्राटदारावर कारवाई होऊन पुन्हा नव्याने कामाच्या निविदा काढण्यात आल्या. आज या कामाला ना. पंकजाताई मुंडे यांनी भेट देवून पाहणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मी जिल्हयात दहा हजार कोटीचे रस्ते आणले, सर्व रस्ते झाले परंतु माझ्याच मतदारसंघातील रस्ता राहिला याबद्दल मला खंत आहे, यात माझा किंवा प्रशासनाचा दोष नव्हता, कांही तांत्रिक अडचणी व कंत्राटदाराचे बॅक खाती गोठविण्यात आल्याने रस्त्याचे काम रखडले. आता पुन्हा नव्याने टेंडर काढले आहे, तसेच सध्या हे पुन्हा सुरू करण्यात आले असून महिनाभरात कन्हेरवाडी पर्यंतचा रस्ता पुर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित असलेल्या  राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांना त्यांनी गतीने काम पुर्ण करण्याच्या सूचना केल्या.
••••