Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान ! रोडरोमिओं टोळक्याच्यां अश्लिल शेरोशायरीने मुलीं ञस्त...! ; पोलिस प्रशासन व दामिनी पथकाचे दुर्लक्ष;


   सध्या परळी ,अंबाजोगाई  येथील विधानगर,राणी लक्ष्मी टॉवर परिसर तर अंबाजोगाई येथे परळीरोडवरील शाळा महाविद्यालयांच्या बाहेर रस्त्यारस्त्यांवर वखवखलेल्या नजरा रोखत रोडरोमिओंची टोळकी थांबलेली दिसत आहेत.अश्लिल शेरोशायरी करत मुलींचे हात धरण्यापर्यंत त्यांची मजल जाते आहे . हे सगळे घाणेरडे प्रकार मुली-तरुणी स्वीकारताना दिसतात. निमूटपणे हा छळ सहन करणे एवढेच त्यांच्या हाती असते. एरव्ही अनेक प्रकरणांत पोलीस ‘आमच्याकडे तक्रार आली तरच कारवाई करू’, असे सांगत असतात. छेडछाडीविरुद्ध तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही पोलीस नेहमी करीत असतात.

‘निर्भया’वरील अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार व पोलीस यंत्रणा अधिक जबाबदार आणि संवेदनशील होतील, असे वाटत होते. फौजदारी कायद्यात झालेल्या कठोर अशा तरतुदींमुळे, असे गुन्हे करणा-या गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरेल, असा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला होता. पण गेल्या काही दिवसांत झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी हा विश्वास फोल ठरवला आहे. सर्वसामान्य माणसाला रोडरोमिओंची चीड वाटत असली, तरी परिस्थितीने तो मजबूर असतो. गुंडप्रवृत्तींवर जरब बसविण्याचे काम पोलिसांनाच शक्य असते.

 परंतु काही ठिकाणी गुन्हेगारांना शोधणे दूरच, गुन्हा न नोंदवता तो दडपून टाकण्याच्या वृत्तीलादेखील विकृतीच म्हणावे लागेल आणि ही विकृती प्रत्यक्ष गुन्हेगाराच्या विकृतीइतकीच भयंकर आणि ओंगळ आहे. यादडपणाखाली जीवन कंठणा-या हजारो मुलींना निर्भयपणे कधी फिरता येणार, हा खरा प्रश्न आहे.

पोलीस खात्याने निदान आपल्या ब्रीदवाक्याला तरी जागले पाहिजे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य आहे. पण, आज त्याच्या अगदी उलट स्थिती असल्यासारखी पोलीस खात्याची वागणूक आहे. अंगात एकदा खाकी कपडे चढवले की पोलिसांमधील माणुसकी संपते की काय, असेच वाटते. याचा अर्थ, पोलीस खात्यात सर्वच बेजबाबदार आणि संवेदनाहीन आहेत, असे नाही. काही प्रामाणिक आणि कर्तव्याला जागणारे अधिकारी आणि कर्मचारीही आहेत, पण त्यांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहे.

याठिकाणी दामिनी पथकाच्या गस्ती फेऱ्यात वाढ करण्यात यावी व या गैर प्रकार करणाऱ्या विरुध्द कठोर कार्यवाही करावी. यासर्व  अपप्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास अनुचित प्रकार घडून विद्यार्थिनींच्या मनोबल खच्ची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शहरातील शाळा -महाविद्यालय आणि टिवशन परिसरात दामिनी पथक कार्यान्वित करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे