Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PM |स्वच्छ आणि पारदर्शी राजकारण कसं असावं? या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ताई.| खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे

स्वच्छ आणि पारदर्शी राजकारण कसं असावं? या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ताई..
@ खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे



वैवाहिक जीवन जगताना आयुष्यात एक नवा मोड आला. बाबांच्या जाण्यानंतर ती पोकळी भरून काढण्याचा निर्णय त्यासाठी माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि नंतर पाच वर्षात मी खासदार म्हणुन केलेलं काम, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधुन मिळालेलं यश याचं श्रेय जसं मतदार कार्यकर्त्यांचे आहे तितकेच मला भगिनी पंकजाताईला द्यावं वाटतं. माझ्या पावलोपावली निर्णयात ज्या भगिनीचा वाटा आहे तिच माझ्यासाठी सर्व काही आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण करताना केवळ विकास आणि विकास हाच ध्यास घेतलेलं हे नेतृत्व आमच्या सारख्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या उमेदीला बळ देणारं आहे. जिल्ह्यात नगर-बीड-परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला, राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला, आरोग्याचे अनेक प्रश्न सोडवले.या सर्व विकासाच्या मागे एक ताकद ती म्हणजे ताई.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.राजकारण कसं करावं?, कुणासाठी करावं?, काय केलं पाहिजे? स्वच्छ आणि पारदर्शी राजकारण कसं असावं? या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ताई. त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणुक लढवण्याचा आदेश दिला आणि निवडुनही आणलं. मी नाममात्र आहे.

सर्व काही ताईच आहेत.खासदार म्हणुन पाच वर्षे काम करताना त्यांनी सतत मला बीड जिल्हा आणि विकास हे समजुन सांगितलं. आपण सर्वसामान्य जनता हेच केंद्रबिंदु मानुन सेवा केली पाहिजे. बाबांचं जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी परिश्रम घेतलं पाहिजे.कार्यकर्ते, हितचिंतक यांनाही न्याय मिळवुन दिला पाहिजे. अशा अनेक प्रश्नावर त्यांचं मार्गदर्शन सतत मिळतं. खरं तर बाबांचं जाणं डोळ्यासमोरून जातच नाही.पण जगण्याचं बळ आणि डोळ्यातील आश्रुला मागे परतवण्याची ताकद ताईमध्ये आहे. आम्ही भगिनी सतत विकासावरच बोलत राहतो. कौटुंबिक स्नेह मिलन याला वेळ मिळत नाही. रेल्वेचा प्रश्न, रस्ते विकास प्रश्न एवढंच नव्हे तर केंद्र सरकारच्या योजनेतुन बीड जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते केलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यांचं राजकारण मी जवळुन पाहत आहे. स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण करताना सुडाचं राजकारण, द्वेष आणि मत्सराचं राजकारण न करण्याच्या त्यांच्या सुचना भुमिकेतुन पहायला मिळतात. ऊसतोड कामगार असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असो संसदेत जेव्हा जेव्हा मी प्रश्न उपस्थित करते. त्यामागे ताई हीच शक्ती असते.
विज्ञान आणि परिवर्तन एवढंच नव्हे तर अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद ताईमध्ये आहे. त्यांच्या माध्यमातुन मागच्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात करोडो रूपये विकासकामासाठी निधी आला. योजना आणि निधी मंजुर करून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. ताईच्या नेतृत्वाचा मला नेहमीच स्वाभिमान वाटतो. एक भगिनी मातृत्वाचं प्रेम लावते. पितृत्व माया लावते. बंधुत्व जीव लावते. वेगवेगळ्या रूपाने माझ्या पाठीमागे, कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या उभा राहतात. लोकसभा निवडणुकीत माझ्यासाठी त्यांनी घेतलेलं परिश्रम मी शब्दात वर्णन करू शकत नाही. विरोधकांनी जातीपातीच्या राजकारणाचा निवडणुकीत वापर केला. नको नको ते त्रास सहन करावा लागला.मात्र पंकजाताईंनी अगदी सामान्य जनतेला आवाहन करत माझा विजय खेचुन आणला.नव्हे तर प्रचंड मताने मला विजयी केलं. त्याचं सर्व श्रेय मी पंकजाताईंना देते. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना बीड जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अनेक योजना हाती घेण्याचा माझा मानस आहे. आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना माझ्या या लाडक्या मोठ्या भगिनीला चांगलं आयुष्य मिळावं, आरोग्य चांगलं रहावं हीच प्रभु वैद्यनाथाच्या चरणी माझी प्रार्थना.
@ खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे
बीड लोकसभा मतदारसंघ

*जबरदस्त वायरल|video|*

*ताईसाहेब तुम्हाला सलाम...*

*मुंडेसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सदैव..लढा देणाऱ्या झाशीची राणी पंकजाताई मुंडे*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/pm.html*

*स्वच्छ आणि पारदर्शी राजकारण कसं असावं? या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ताई.| खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे*

*थेट Live का ? यावं लागलं पंकजाताई मुंडे ला काय म्हणाल्या ते ऐकूया...*

*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

*माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_7.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*