Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

यंदाच्या निकालातही मुलींनीचीच बाजी दहावीच्या निकालाकडे राज्यातल्या विद्यार्थ्यांचे लक्ष... राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के.



पुणे // दहावी बोर्डाचे निकाल जाहीर झाली असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७. २७ टक्के इतका लागला आहे. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के. निकालात तब्बल १२ टक्के घट. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटला आहे अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.