परळी // येथील जिजामाता उद्यानातून 19 वर्षीय मुलीचे अपहरण करून हैदराबाद येथे बलात्कार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तब्बल तीन महिन्यानंतर परळी पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील भागातील 19 वर्षीय मुलीने आज दिनांक 7 जून रोजी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शहरातील स्वप्निल गुंडाळे आणि राजू जाधव या दोघांनी तीन महिन्यापूर्वी येथील जिजामाता उद्यानातून आपले स्कार्पिओ गाडीतून अपहरण करून हैदराबाद येथे घेऊन गेले व दोन दिवस बलात्कार केला, त्यानंतर परळीत आणले असे पोलिसांना सांगितल्याचे समजते याप्रकरणी 363, 366 ,376 भादवि. 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी हे करीत आहेत.
परंतु याप्रकरणी शहरात उलटसुलट चर्चा होत असून 3 महिन्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल .का? अशीही चर्चा नागरीकात होत आहे.
Social Plugin