Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विदर्भाची पंढरी ! संत श्रेष्ठ गजानन महाराज आषाढी एकादशीनिमित्त वारकरी व भक्तांच्या समवेत शेगाव येथून पंढरपूरला प्रस्थान ....


शेगांव// विदर्भाची पंढरी म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगभर आहे असे संत श्रेष्ठ गजानन महाराज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनाकरिता आपल्या राजेशाही थाटात अश्व हत्ती टाळ मृदंग आणि वारकरी व भक्तांच्या समवेत शेगाव येथून दिनांक 8 जून रोजी  पंढरपूरला प्रस्थान झाले आहेत .

०८ जून ला सकाळी सात वाजता महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरकडे निघाली,
@पहिला पडाव ०६ किलोमीटर अंतरावर असलेले गुरु भाऊ गोमाजी महाराज नागझरी संस्थान येथे राहील ,गोमाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर महाराजांची पालखी

@पारस, भैरद मार्गे अकोला कडे निघेल, अकोला येथे महाराजांची पालखी दोन दिवस थांबते

@या पालखीमध्ये सातशे वारकरी असून चालते फिरते रुग्णालय, जागोजागी वारकऱ्यांच्या थांबवण्याकरता जी व्यवस्था लागते ते साहित्य  पिण्याच्या पाण्याचे टॅंकर व आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू पालखीसोबत असतात हा संपूर्ण प्रवास १२०० किलोमीटरचा असून सहाशे पन्नास किलोमीटर जाणे आणि पाचशे पन्नास किलोमीटर परत येणे असा असून

@ दिनांक दहा जुलै रोजी महाराजांची पालखी आळंदी येथे पोहोचेल 12 तारखेला आाषढी एकादशी (देवयानी एकादशी ) ला विठ्ठल माऊलीचे दर्शन करून सोळा तारखेला परतीच्या मार्गाला राहील,

@पहिला पडाव करकंब येथे असून

@दिनांक 29 जुलै ला बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंदखेड राजा येथे पालखीचे आगमन होईल तर

@दिनांक 5 /8/19 रोजी नागपंचमीला खामगाव, रजत नगरीत पालखीचे आगमन होईल  येथे पालखीचे दिव्य भव्य स्वागत होईल

@ दिनांक 6 /8 /19रोजी शेगावला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचं आगमन होते असा हा एकून 1200 किलोमीटरचा प्रवास वारकरी नाचत गाजत पूर्ण करतात.
ही उर्जा हा उत्साह वारीत पायी चालत गेल्याशिवाय अनुभवता येत नाही