Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चलो पुणे ! चलो पुणे !! चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध लागू करुन सर्व शिक्षकेतरांची भरती लवकरात लवकर करावी नसता धरणे आंदोलनास सरकारने जवाबदार राहावे .



कोल्हापूर//  आपल्या न्याय मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी पावसाळी अधिवेशन काळात सोमवार दिनांक २४ जून २०१९ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे येथे एक दिवसाचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन महामंडळाने आयोजित केले आहे .या अनुषंगाने  रविवार दि. 9 जून 2019 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाची कार्यकारिणी सभा कोल्हापूर येथे संपन्न झाली.

सभेमध्ये झालेले निर्णय पुढील प्रमाणे :

१) महामंडळाच्या वतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध  शासन नियुक्त समितीने सादर केलेल्या अहवालानुसार लवकर जाहीर करावा.

२) सर्व शिक्षकेतरांची भरती लवकरात लवकर चालू करावी.

३) चतुर्थ श्रेणी कर्मचारी बांधवांच्या वेतन श्रेणी मधील होणारी अन्यायकारक वसुली
थांबवावी.

४) प्रयोगशाळा साहाय्यक  परिचर व ग्रंथपाल यांच्या ग्रेड पे मुळे होणारे नुकसान

५) ७ मार्च २०१९ च्या लिपीक, ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या पदभरतीबाबत शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्याबाबत

असे अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी व आपल्या न्याय मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी पावसाळी अधिवेशन काळात सोमवार दिनांक २४ जून २०१९ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे येथे एक दिवसाचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन महामंडळाने आयोजित केले आहे . या आंदोलनास राज्यातील सर्व जिल्ह्यातून शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन शिवाजी खांडेकर
सरकार्यवाह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांनी व सर्व  शिक्षकेतर यांनी   केले आहे .