Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अखेर ! चांदापुर फिडरवर २४ तास वीज पुरवठा द्यावा ; जिल्हाधिकाऱ्यांचे वीज वितरणलाआदेश ...


 ● परळी वैजनाथ // परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पातील पाणी साठा शिल्लक न राहिल्यामुळे आता शहरात फक्त ट्रँकरनेच पाणी वाटप करण्यात येत आहे.चांदापुर रोड वरील काही विहिरी आणि विंधन विहिरींमधून सर्व ट्रँकर भरले जातात, परंतु चांदापुर फिडर वर 16 तासाची लोडशेडिंग आल्यामुळे ट्रँकर भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या चांदापुर फिडरवर २४ तास वीज पुरवठा द्या अशी वीज वितरणकडे राष्ट्रवादी काँग्रेसने  निवेदना द्वारे आग्रही मागणी केली. याबाबत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे हे जिल्हाधिकारी यांना बोलले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून प्रथम प्राधान्य म्हणून चांदापुर  फिडर वर 24 तास विद्युत पुरवठा द्यावा असे आदेश दिले आहेत.
     याबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपविभागीय अभियंता  थिटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, श्रीकृष्ण कराड,अनंत ईंगळे,महादेव रोडे, यांच्यासह  पदाधिकारी यांनी  निवेदन देवून चांदापुर  फिडर वर 24 तास विद्युत पुरवठा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला होता.
       दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर याची तातडीने दखल घेण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून प्रथम प्राधान्य म्हणून चांदापुर  फिडर वर 24 तास विद्युत पुरवठा द्यावा असे आदेश दिले आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तातडीने मार्गी लावल्याबद्दल ना. धनंजय मुंडे त्याचप्रमाणे  जिल्हाधिकारी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व पदाधिकारी यांनी  आभार मानले आहेत.