Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

देशातील सर्वात मोठी बँक !! स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेतील पैसे सुरक्षित करण्यासाठी सांगितले काही उपाय करा ; कोणत्या आहेत ‘टिप्स’ तर वाचा...


मुंबई //  आजकाल बँक देखील सुरक्षित नसल्याची भावना काही वेळा ग्राहकांमध्ये होते. अधिकृत माहितीनुसार गेल्या काही वर्षात देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये २३,७३४.७४ कोटी रुपयांच्या एकूण ६,७९३ फसवणुकी समोर आल्या आहेत. देशातील बँकांची नियामक असणाऱ्या RBI च्या आकडेवारीनुसार बँकेत ५० हजाराहून जास्त फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यांमध्ये २.०५ कोटी रुपयांची अफरातफर झालीय. बँक फसवणुकीच्या बातम्यांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  यामध्ये ATM द्वारे होणाऱ्या फसवणुकी मोठ्या प्रमाणात आहेत. आता ग्राहकांना सावध करताना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही उपाय SBI ने सांगितले आहेत.
काय आहेत SBI नं सांगितलेलया टिप्स :
१. तुमचं बँक खातं आणि नेट बँकिंग यांची माहिती कोठेही लिहू नका अथवा फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका. दर काही दिवसांच्या अंतराने तुमचा इंटरनेट बँकिंग पासवर्ड बदलत राहा.
२. तुमच्या फोनमध्ये बँक खात्याचा नंबर, एटीएम कार्ड, पासवर्ड या माहितीचे फोटो ठेवलेत तर माहिती लीक होऊ शकते.त्यामुळे असे करणे टाळा.
३. तुमच्या उपकरणामध्ये अँटिव्हायरस स्कॅन नेहमी चालू ठेवा.
४. ओपन नेटवर्क, पब्लिक डिव्हाइस आणि फ्री वायफाय वापरू नका. असे केल्याने तुमची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.
६. नेहमी वन टाइम पासवर्ड ( OTP ) च्या साहाय्याने ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन करा. यामुळे अधिक सुरक्षित ट्रॅन्झॅक्शन होते.
७. बँकेच्या संदर्भातील वेगवेगळे पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड ( CCV ) आणि युपीआय पिन इत्यादी कुणालाही सांगू नका.
८. फिशिंग ई-मेल वर कधीही क्लिक करू नका. यातून फसवणुकीची शक्यता असते.