Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुडन्यूज ! २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यास शिक्षण मंत्री सध्यातरी सकारात्मक...


अहमदनगर // १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाऊसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर निर्धार धरणे आंदोलन सुरु आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने नुतन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेत सदर प्रश्नासंदर्भात चर्चा करुन निवेदन दिले.
शिक्षणमंत्री शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत २००५ पुर्वीच्या शिक्षकांना लवकरच पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी देण्याचे सुचक वक्तव्य केल्याने जुनी पेन्शन पासून वंचित असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी माहिती दिली.
शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, मा. आ. भगवानआप्पा साळुंखे, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, नरेंद्र वारकरी, संजय यवतकर यांनी जुनी पेन्शन संदर्भात शिक्षणमंत्री शेलार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.