Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

YogaDay 2019 !! कशी झाली आंतराराष्ट्रीय योग दिवसाची सुरवात ? योग दिवस २१ जुनलाच का ? जाणून घ्या सविस्तर -


अंबाजोगाई // राष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी  दि. २१ जून रोजी श्रीयोगेश्वरी शिक्षण संस्था संचलीत, योगेश्वरी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सामुहिक योगासनाचे आयोजन करण्यात येणार आहे

उधा दि. 21 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर राष्ट्रीय योगदिन साजरा होणार आहे. त्यात पाच हजार नागरिक , विद्यार्थी , शिक्षक , कर्मचारी , बचत गटाच्या माहिला सहभागी होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार गणेश सोनवणे यांनी दिली .

  जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने झाली आहे. २७ सप्टेंबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत जगभरात एकाच दिवशी योग करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ११ डिसेंबर २०१४ ला हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि आंतराराष्ट्रीय योग दिवस अस्तित्वात आला.

@ २१ जुनलाच का साजरा केला जातो योग दिवस ?

तुम्ही कधी विचार केलाय का कि २१ जुनलाच योग दिवस का साजरा केला जातो. या मागे देखील एक खास कारण दडलेले आहे. २१ जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवसाला ग्रीष्म संक्राती म्हणून देखील ओळखले जाते. भारतीय परंपरेनुसार ग्रीष्म संक्रातीनंतर सूर्याचे दक्षिणायन सुरु होते. असं सांगितलं जात की, सूर्याचे दक्षिणायन अध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी खूप लाभकारक असते. या कारणांमुळे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

भारताच्या नावावर दोन रेकॉर्ड
२१ जून २०१५ ला पहिला आंतराराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पहिल्या योग दिवशी भारताने दोन शानदार रेकॉर्ड देखील बनवले. या दिवशी पंतप्रधान मोदींनी ३५ हजार लोकांसह दिल्लीतील राजपथ मैदानावर योग केला होता. पहिले रेकॉर्ड ३५,९८५ लोकांसोबत योग करणे आणि दुसरे रेकॉर्ड ८४ देशांच्या लोकांचा सहभाग या कार्यक्रमात होता त्याच धरतीवर अंबाजोगाई येथे या दिवसाचे आयोजन केले आहे .

त्यात शहरातील विविध शाळा -महाविद्यालयाचे विद्यार्थी , राष्ट्रीय छात्रसेना , राष्ट्रीय सेवा योजना,पोलिसदल ,रोटरी क्लब , जेष्ठ नागरिक संघ , पत्रकार संघ , शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत .

या राष्ट्रीय योगादिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन   शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ राऊत , श्रीयोगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश खुरसाळे व सर्व मान्यवर संचालक , मुख्याध्यापिका के.टी.व्यास , धनंजय इंगळे , स्वप्नील चामले , रोटरीचे प्रविण चोकडा , मोईन शेख , संतोष माहिते , प्रा . दामोधर थोरात , पोलिस निरीक्षक सूर्यवंशी , आभिमान भालेराव ,ग्रामिण पोलिस उपनिरीक्षक मनिषा लटपटे ,
डॉ . गणेश माले , डॉ . निशिकांत पाचेगावकर , शेख अब्बास , वंदना कुलकर्णी , एन .ए. म्हातारमारे , क्रीडा संयोजक दत्ता देवकते ,शिवकुमार निर्मळे, रमण सोनवळकर , चंद्रकांत साळुंके आदीनी केले आहे .