Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईच्या लेकीचा औरंगाबादमध्ये गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित शिक्षिका रंजना राठोड

अंबाजोगाई // महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीयआदर्श शिक्षकसे वासन्मान पुरस्कार सोहळा औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिरात
नुकताच झाला, अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे माजी प्रा.स्व.गणपतराव राठोड यांच्या कन्या व वडेल ता. धुळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिका रंजना गणपतराव राठोड यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार श्रीकांत देशपांडे आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. सौ. राठोड यांना मिळालेल्या
पुरस्काराबद्दल श्री. शिंदे, श्री. बैसाणे, श्री. देवकर, प्रा. डॉ. सुदाम राठोड,श्री. पवार, श्री. साळुखे, किशोर भामरे, भूपेश वाघ, विद्या साळवे, विलास
पाटील, प्रा. डॉ. मधुकर चव्हाण, विश्वजित राठोड, रविकिरण राठोड,वडेल येथील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ व महाराष्ट्र
पुरोगामी शिक्षक संघटनेने समाधान व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या .