Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोठा अनर्थ टळला…! परळी अकोला रेल्वे इंजिनचा एक मनोरुग्ण झाला रेल्वे मोटरमन...कसा ते वाचा.



परळी //  मंगळवारी परळी अकोला गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत झालेली घटना धक्कादायक आहे . परळी एक मनोरुग्ण तब्बल 40 मिनिटे इंजिनमध्ये बसून होता. शिवाय तो रेल्वे चालवण्याचाही प्रयत्न करत असल्यामुळे प्रवाशांचा एकच थरकाप उडाला. जर त्याने ट्रेन सुरु करुन पुढे नेली असती, तर मोठा अनर्थ …घडला असता ते काय झालं असतं याचा अंदाजच न लावलेला बरा.

 
मात्र वेळीच रेल्वे केबिनमध्ये आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांने व पोलिसांनी या मनोरुग्णास बाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.तो टळला...

परळी स्थानकावर दुपारी परळी अकोला गाडी थांबली होती. गाडी सुटण्यास अवकाश असल्याने मोटरमन व त्याचा सहाय्यक केबिनमध्ये आले नव्हते. त्याचवेळी एक तरुण रिकामी केबिन बघून आत चढला व मोटरमनच्या सीटवर बसला. फलाटावर उभे असलेल्यांना तो मोटरमनच असावा असे वाटले. यामुळे त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष दिले नाही. मात्र काहीवेळानंतर मोटरमन व त्याचा सहाय्यक आले. केबिनमध्ये मनोरुग्ण व्यक्ती बसली असून ती तेथील यंत्रणेबरोबर छेडछाड करत असल्याचे बघून त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी लगेचच त्याला खाली उतरण्यास सांगितले. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. अखेर 40 मिनिटांनंतर पोलिसांनी मनोरुग्णास केबिनमधुन बाहेर काढले.