Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गण-गण गणात बोते ! आज संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबाजोगाईकडे प्रस्थान...



परळी // आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर
हरे कृष्णा हरे रामा, गण-गण गणात बोते, ज्ञानोबा – तुकारामांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले
प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून भाविकांचे श्रध्दास्थान असलेले विदर्भातील श्रींची पालखी  दाखल झाली होती . या दिंडीचे यंदा हे 52 वे वर्ष आहे यात 650 वारकरी सहभागी झालेले आहेत.

या पालखीचे नागरीकांनी उत्साहात स्वागत केले व दर्शन घेतले. काही ठिकाणी वारकर्‍यांच्या अल्पोपहाराची सोय केली होती. कांही जणांनी फराळ, चहापाणी, भोजनाची व्यवस्थाही केली होती. श्रीच्या दिंडीत असलेल्या वारकर्‍यांच्या मुखातून हरे कृष्णा हरे रामा, गण-गण गणात बोते, ज्ञानोबा – तुकारामांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. संत जगमित्र नागा मंदिरात श्रींची आरती झाली .

पंढरपुरकडे निघालेल्या शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा संत जगमित्र मंदीरात बुधवारी मुक्कामी होती . दि.27 रोजी सकाळी 6 च्या सुमारास ही पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान करणार आहे.

वैद्यनाथ नगरीच्या आज सकाळीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंढरपूरच्या वारी मार्गा वरील बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पावन झालेले परळी हे हरी-हर क्षेत्र असल्याने वारकऱ्यांमध्ये याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याचबरोबर संत जगमित्रनागा महाराजांचीही येथेच समाधी असून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे..
दरम्यान  गजानन महाराजांचा पालखीचा तब्बल तीन वर्ष झाली तरी परळी अंबाजोगाई  पालखीचा मार्गचे काम अपुरेच खड्डे  गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. या रखडलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे. कमीत कमी गजानन महाराजांच्या पालखीसाठी या मार्गाची तात्पुरती डागडुजी व्हायला पाहिजे होती मात्र तसे झालेले दिसत नाही. तसेच परळीत मोठे तिर्थक्षेञ असून संत मंडळीच्या पायवाटावर अनेक ठिकाणी रांगोळी काढल्या जातात रस्ते पालखीचा मार्ग स्वच्छ केले जातात परंतु परळी  न.प.ने पालखी मार्गावर साधा झाडूही मारला नसल्याची चर्चा परळीकरांमध्ये दिसत होती .