परळी // परळीतअवैध धंदे बोकाळले! हिंदनगर परिसरात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे . त्या गंगाखेड येथील तरुणाचा खून झाला की अपघात ही अजूनही शंकाच आहे .तपासत निष्पन्न होईल घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे .
शहरातील हिंदनगर भागात युवकाचा मॄतदेह गंगाखेड तालुक्यातील देऊळगाव गाथा ज्ञानेश्वर किशान कोल्हे यांचा असल्याचे निष्पन्न झाले .सदरील व्यक्ती अतिमद्यपान केल्यामुळे व अगोदरच आजारी असल्याचे तपासात आढळून आले.म्हणून याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.असे पोलिस सूञाकडून मिळालेल्या माहिती नमुद केले आहे .
याघटनेत सैदवाने , परंतु या भागातील वातावरण महिला व इतरांसाठी असुरक्षित आहे .हे माञ मान्कयरावे .लागले युवकाचा मॄतदेह आज बुधवार दि.8 मे रोजी पहाटे 5 च्या सुमारास आढळून आला असून पोलिस मात्र 8 वा. हा प्रकार नेमका काय आहे? हे तपासानंतरच समजू शकेल. दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील हिंदनगर भागात आज बुधवार दिनांक 8 मे रोजी अज्ञात युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून या भागातील वाढणारे अवैध धंदे बंद करण्यात यावेत याबाबत पोलिस प्रशासनास लेखी निवेदने दिली असल्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सांगितले. या घटनेने तरी पोलिस प्रशासनाने या भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
@अवैध धंदे बोकाळले!
परळी शहरात सुरू असलेले . हिंदनगर, उड्डाणपूल परिसर, रेल्वे रुळाच्या परिसरात सर्रास अवैध धंदे चालू आहेत. या अवैध धंद्यांचा परिणामस्वरूप अशा घटनांमध्ये होतो आहे. याकडे मात्र पोलीस प्रशासन डोळेझाक करते की काय? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. अवैध दारू, मटका, जुगार यांसह अनेक प्रकारचे “उद्योग” येथे दिवसाढवळ्या सुरू आहेत. “ड्राय डे” डे च्या दिवशीही येथे रस्त्यावर दारू विक्री करण्यात येते. या गोष्टींचा या भागातील इतर सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. मात्र यावर ठोस अशी कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. हा संपूर्ण भाग संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या भागातील अवैध धंद्यांकडे पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
Social Plugin