आपले पाल्य इंटरनेट वर काय पाहतात ? कोणते गेम्स खेळतात त्याच्या आयुष्यावर त्याचा किती परिणाम होत आहे. या गोष्टींकडे लक्ष देणे आज महत्वाचे का?ते वाचा...
क्राईम स्टोरी
वॉशिंग्टन // काही दिवसांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ ‘मोमो’ या गेम्स मुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर आता नेटफ्लिक्स वर झळकणाऱ्या एका मालिकेमुळे १२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे.
आपले पाल्य इंटरनेट वर काय पाहतात ? कोणते गेम्स खेळतात त्याच्या आयुष्यावर त्याचा किती परिणाम होत आहे. या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे असते . त्यामुळे नेटफ्लिक्स वर झळकणारी मालिका ’13 reasons why’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वादग्रस्त मालिकेविरोधात अमेरिकेत तक्रार करण्यात आली आहे.
घटनास्थळी सापडली रहस्यमयी सुसाईड नोट
अमेरिकेतील १२ वर्षीय मुलीने आपल्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे ’13 reasons why’ ही मालिका पाहून या मुलीने आत्म्हत्या केल्याचे बोलले जात आहे. जेसिका स्कॅटरसन असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. तपासादरम्यान या मुलीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ज्यात तिने आपल्या मृत्यूसंदर्भात सहा कारणे नमूद केली आहेत. या घटनेत विशेष बाबा म्हणजे या मालिकेतील पात्र ज्याप्रमाणे स्वतःचे आयुष्य संपवते अगदी त्याचप्रमाणे या मुलीने आपले जीवन संपवले आहे.
मालिका पाहून मुलीच्या वागण्यात झाला होता बदल
या घटनेनंतर या १२ वर्षीय मुलीच्या आईने देखील ’13 reasons why’ ही मालिका पाहून मुलीने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत जेसिकाच्या आईने सांगितले की, ‘माझी मुलगी ही मालिका पाहत असताना तिच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल जाणवत होता. जेसिकानं आपल्या रूममध्ये फासावर लटकणाऱ्या मुलीचं चित्रदेखील काढलं होतं. तसंच तिच्या हातावर ब्लेडनं केलेले वारदेखील आढळले होते’.
Social Plugin