Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अनेक खाते अॅन्टी करप्शनच्या रडारवर ! १२ हजारांची लाच घेताना महिला ग्रामसेवक ‘अॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात


जालना // जालना तालुक्यातील बाजी उम्रद येथे जागा खरेदी केली आहे. ही जागा नावाने करण्यासाठी आणि जागेची ग्रामपंचायतला नोंद घेऊन नमुना नंबर ८ चा उतारा देण्यासाठी जागेची नोंदणी नमुना नंबर ८ मध्ये करण्यासाठी मंजुषा गोविंद जगधने (वय-३२) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला ग्रामसेवकाचे नाव आहे. १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना या महिला ग्रामसेवकास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) करण्यात आली.  मागील वीस दिवसात जिल्ह्यामध्ये तीन ग्रामसेवकांना लाच घेताना पकडण्यात आल्याने महसूल खाते अॅन्टी करप्शनच्या रडारवर आले आहे.
तक्रारदार यांनी जालना तालुक्यातील बाजी उम्रद येथे जागा खरेदी केली आहे. ही जागा नावाने करण्यासाठी आणि जागेची ग्रामपंचायतला नोंद घेऊन नमुना नंबर ८ चा उतारा देण्यासाठी जगधने यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता जगधने यांनी तडजोडीत १२ हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. पथकाने आज जगधने यांच्या घराजवळ लापळा रचून मंजुषा जगधने यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक काशिद, व्हि. एल. चव्हाण, पोलीस कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत यांनी केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन