पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त नागरिकांचे पुनश्च आमरण उपोषण....
परळी // सध्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे, या परिस्थितीत पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे.अश्या परिस्थितीवर मात करत परळी नगर पालिकेने प्रत्येक वार्डात पाणी वाटपासाठी तब्बल 28 टँकर सुरू केले. पण त्यातही नगर सेवकांच्या मनमानी कारभारामुळे आत्ता सुद्धा काही नागरिकांना कधीच पाणी दिले जात नाही.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी नळाचे कनेक्शन घेतले ,पण त्या कनेक्शनला अचानक नळाचे पाणी येणे बंद झाल्यामुळे नागरिकांत भलतीच धांदल उडाली आहे.
सध्या रमजानचा महिना सुरू आहे अश्या परिस्थितीत जाणून बुजून नळाला पाणी येऊ दिले जात नाही असा आरोप काही नागरिकांनी केला असून याला कारणीभूत याच भागातील नगरसेवक आहे, असे बोलले जात आहे.
याच लाईनच्या वरील भागतील लोकांना 2 ते 3 तास फुल स्पीड ने नळाचे पाणी येते, व अवघ्या एक फूटाच्या अंतरा पासून खालच्या लोकांना एक थेंब पाण्यासाठी वाट पाहावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनला मनमानी व अवैध पद्धतीने कनेक्शन घेतल्यामुळे जुनेरेल्वे स्टेशन,च्या भागात तसेच मिलिंद नगरच्या काही भागात पिण्याचे पाणी येणे गेल्या तीन महिन्यापासून अचानक बंद झाले आहे, या बाबतीत परळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा या भागातील पाण्याची अडचण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सोडवली नाही. या जाचाला कंटाळून या भागातील नागरिकांनी याच महिन्याच्या 6 तारखेला परळी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण केले होते, परंतु न.प. च्या अधिकाऱ्याने लिखित आश्वासन दिले होते व मागणी प्रमाणे काम करू तसेच आठ दिवसात पूर्ववत पाणी सुरू होणार असे ठणकावून सांगण्यात आले होते.
या साठी या नागरिकांच्या नळाला जोपर्यंत पाणी सुरू केले जात नाही तसेच अवैध नळ जोडणी तात्काळ तोडली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे आमरण उपोषण कर्त्या कडून बोलले जात आहे.
Social Plugin