बीड // महाराष्ट्रातील ही विज दरवाढ अत्यंत भयानक असुन बाकी कुठल्याहि राज्यात एवढा दर नाही.सध्या आहेत तेच दर जास्त आहेत.एकिकडे स्वस्त विज देऊ म्हणता आणि दर वाढविता हा महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय आहे.इतर राज्यातील दराशी तुलनात्मकदृष्ट्या विचार करून दर वाढवण्याबाबत विचार करावा.विज दर कमी करून जनतेचा मदत होईल हि
आशा विजदर वाढीचा आम्ही जाहीर निषेध करत राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीजदर पुन्हा वाढवून ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा चटका दिला आहे.
१ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार,
राज्य वीज आयोगानं गेल्या वर्षी १२ सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे.
@अशी झाली दरवाढ
दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांकडून महावितरण ५.३० रुपये प्रति युनिट इतका दर आकारतं. आता त्यामध्ये १६ पैशांची भर पडेल. त्यामुळे एका युनिटसाठी ५.४६ रुपये मोजावे लागतील. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिटमागे २४ पैसे जास्त मोजावे लागतील. ५०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे. वीजदरांसोबतच स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ . तो ८० रुपयांवरून ९० रुपये झाली आहे.
महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन - सौ. कादम्बरी
महाराष्ट्रात युनिट रेट आहेत
०-१०० - रु २.९८
१०१- ३०० - रु ६.७३
३०१ - ५०० - रु ९.६९
.
तेच दिल्लीमधे
०- २०० - रु २
२०० च्या वर - रु २.९७५ / ३
वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ
.
म्हणजेच
महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/-
आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-
.
या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे. त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U .
म्हणजेच मगील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना चटका दिलेला आहे. या विरोधात कोणी आवाज उठवेल काय ?
विज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडणार आहे. महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन ही
अखिल भारतिय उपभोक्ता ( ग्राहक ) प्रतिबंध न्यायमंच सौ. कादम्बरी प्रल्हाद भोन्डे महिला डायरेक्टर ( महाराष्ट्र राज्य )९७७३१७६६६५ जागो ग्राहक जागो
Social Plugin