माजलगाव // माजलगाव शहरात एकाच दिवशी फसवणूक-ऍसिड-चाकूहल्ला-अपघात अशा विविध घटनांनी शहर हादरले.
एका सुटबुटातील भामट्याने . ही घटना मोंढ्यातील गणपती मंदिरासमोर घडल शनिवारी सकाळी एका जेष्ठ नागरिकास ‘ तुमच्यासारखे वृद्ध लोकच गांजा विकतात, मी पोलीस आहे, हातातील अंगठी बघू द्या, असे म्हणून एका जेष्ठ नागरिकांकडून सहा ग्रॅमची अंगठी हातात घेऊन धूम ठोकली
नवनाथनगर भागातील जेष्ठ नागरिक नारायण मुसळे व मुरलीधर येवले हे दोघे वृद्ध दररोज सकाळी मोंढ्यातील गणपती मंदिरात दर्शन घेऊन परत निघाले असता मंगलनाथ बँकेसमोर एक सुटबुटातील इसम त्यांचेकडे आला व नारायण मुसळे यांना ‘बाबा’, तुम्हीच गांजा विकता ,असे धमकावून त्यांची दम टाकत झडती घेतली. या दरम्यान हातातील अंगठ्या काढून घेऊन तंबाखूच्या बटव्यात टाकल्याची सांगून तुम्हाला अंगठी घेऊन त्याने धूम ठोकली.
दुसऱ्या घटनेत कालिकानगर भागात घराचा ताबा मिळवण्यासाठी सुनेच्या भावावर व दोन लहान मुलांवर ऍसिड हल्ला करण्यात आला. यामध्ये शेख समीर हा गंभीर जखमी झाला आहे. तर आठ व पंधरा वर्षाची मुलेही जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
कालिकानगर भागातच चाकू हल्ल्याची तिसरी घटना घडली. दोघा जणांवर तीन तरुणांनी चाकू हल्ला चढवला. यात दोघे जखमी झाले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. यातील तिघे आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले.
चौथ्या घटनेत मोटर सायकल ट्रकवर धडकून दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले.तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी पप्पू सटवाजी देशमाने माजलगावला मोटार सायकल क्रं.एम एच-23/9801 वरून आपली पत्नी मंगलसह येत असताना तेथे उभ्या असलेल्या ट्रक क्रं.एम एच-09/बीसी-2800 वर मोटार सायकल धडकली यात त्यांच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर मार लागला, तर मंगल यांनाही गंभीर मार लागल्याने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण दोघांनाही अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Social Plugin