Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची सशस्त्र टोळी जेरबंद...





अहमदनगर  // नगर पुणे रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची सशस्त्र टोळी पकडण्यात आले आहे.  (दि. 2मे ) रात्री पावणेनऊ वाजता कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक केलेल्यांमध्ये दत्ता मुंजाजी लंघे (वय-२० वर्ष रा.शिदोरा, ता.वसमत, जि.हिंगोली), निवृत्ती शंकर चानुळे (वय-२० वर्षे, रा.तेलगाव ता.वसमत, जि.हिंगोली), प्रदिप शिवचरण पारवे (वय-२० वर्षे रा.गोरपुराणा जि.परभणी), मारुती बालाजी शिंदे (वय-२२ वर्ष रा.दुटका, ता.पालम जि.परभणी), गणेश भाऊसाहेब जोगदंड (वय-२० वर्षे रा.गौर ता.पुरणा, जि.परभणी) यांचा समावेश आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ, सहाय्यक फौजदार लक्ष्मण भिमाजी हंडाळ, पोलिस कर्मचारी नितीन शिंदे, बंडू भागवत, अविनाश अशोक बर्डे, सुमित गवळी, रविंद्र टकले, बाबासाहेब तागड, प्रशांत पवार, प्रमोद लहारे आदींचे पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत केडगाव चौफुला ते कल्याण बायपास रोडवर गस्त घालीत होते. पथकाला दर्पण हॉटेलचे रोडच्या कडेला पूर्वेस रात्री पावणेनऊ वाजता पाच इसम संशयित रितीने उभे असलेले मिळून आले. त्यांनी इझडती घेतली असता चॉपर, कोयता, विळा, चाकू, दोन मिरची पुडे, दोन दगड, पाच मोबाईल, दोन स्पेंडर मोटार सायकल असे साहित्य मिळून आले.

ही पाच जणांची टोळी पुणे- नगर रोडवर जाणारे येणारे वाहन चालकांना थांबवून दरोडा टाकण्याचे
तयारीत होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवी 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास वाघ हे करीत आहेत