महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान मदतीला आहेच तरी प्रत्येकीने प्रसंगी मानसिकदृष्ट्या कणखर व्हायला हवे,- डॉ. संजय तुंगार
अंबाजोगाई // अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही, तर सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. महिलांनीही स्वयंरक्षणासाठी मानसिक दृष्टीने कणखर असायला हवे,’ असे विचार पोलिसांच्या सायबर सेलचे पोलिस उपायुक्त डॉ. संजय तुंगार यांनी योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्यावतीने आयोजित महिला आत्मभान
शिबीरात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात व्यक्त केले.
श्री योगेश्वरी शिक्षण संस्था व योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्यावतीने आयोजित महिला आत्मभान
शिबीरात 'सायबर स्पेस ' आणि महिला सुरक्षा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .या वेळी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे व पदधिकारी तसेच सर्व संचालक उपस्थित होते .
या चर्चासत्रात पोलिसांच्या सायबर सेलचे पोलिस उपायुक्त डॉ. संजय तुंगार, यांनी ‘महिलांच्या सुरक्षेसाठी स्त्री पुरुष समानता, नैतिक मूल्यांचे शिक्षण, शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे समाजात वावरताना आपल्या मर्यादा किती आहेत, याचे भान सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक महिलेने ठेवणे आवश्यक आहे,’ असेही मत व्यक्त केले.
‘महिलाविषयक दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जवळपास ९० टक्के केसमधील आरोपी ओळखीच्या व्यक्तींमधील असतात. अनेक क्षेत्रातही हेच चित्र पाहायला मिळते. ज्याच्यावर आधारासाठी आपण अवलंबून आहोत, तेच नाते गुन्ह्यासाठी कारणीभूत ठरल्याचे प्रकार या क्षेत्रात पाहायला मिळतात,’ तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. त्यामुळे गुन्हा करण्यास धजावणाऱ्यांवर वचक बसू शकेल,’ असे पोलिस उपायुक्त डॉ. तुंगार यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान मदतीला असले तरी प्रत्येकीने प्रसंगी मानसिकदृष्ट्या कणखर व्हायला हवे, असेही शेवटी ते म्हणाले .
Social Plugin