Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गेवराई तालुक्यातील कोळगावजवळ अपघातात गरोदर महिलेसह मुलीचा कारमध्ये भाजून मृत्यू



गेवराई //  कार, स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात कारने पेट घेतल्यानंतर गरोदर महिलेचा जळून कोळसा झाला. हा अपघात कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. मनीषा ज्ञनेश्वर जाधव (35) जागीच जळुन ठार झाल्या तर मुलगी लावण्याचाही (14) भाजून मृत्यू झाला.  तर ज्ञानेश्वर जाधव (40) हे 60 टक्के भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले आहे.

गेवराई तालुक्यातील कोळगाव या गावाजवळ कार, स्कॉर्पिओ आणि दुचाकीची धडक झाली. या कार आणि स्कॉर्पिओचा अपघात झाल्यानंतर दुचाकी येऊन धडली. यावेळी कारने अचानक पेट घेतला. या कारमध्ये बसलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु गरोदर महिलेला बाहेर पडता आले नाही. हा तिहेरी अपघात एवढा भयंकर होता की, कारने पेट घेतला होता. त्यात ही महिला गंभीररित्या भाजली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. काहीवेळाने उपचारादरम्यान गंभीर भाजलेल्या लावण्याचाही मृत्यू झाला.