Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लग्नाची मेहंदी पुसण्यापूर्वीच नव विवाहीत तरुण अपघातात ठार...




जळगाव //  लग्न आटोपून घरी परतणाऱ्या तरूणांच्या दुकचाीला भरधाव बँन्डच्या वाहनाने समोरून धडक दिली़ या अपघातामध्ये महेंद्र शिवाजी पाटील (वय-२९, रा़ कुसंूंबा) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर सागर प्रकाश पाटील (वय-२४) हा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९़३० वाजता शिरसोली रस्त्यावरील श्रीकृृष्ण लॉन्ससमोर घडली़ दरम्यान, महेंद्र याचा आठ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता़

तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील यांच्या मुलीचा मंगळवारी सायंकाळी विवाह होता़ त्यामुळे महेंद्र आणि त्याचा मित्र सागर हे दोघे एमएच़१९़एके़ २६८१ क्रमांकाच्या मोटारसायकलीने लग्नाला गेले होते. सायंकाळी लग्न सोहळा आटोपून दोघेही घरच्या मार्गाला निघाले़ शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण लॉन्सजवळ समोरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलीला समोरून येणाºया भरधाव बँन्डच्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र याच्या डोक्याला आणि चेहºयाला जबर मार बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर सागर हा गंभीर जखमी झाला.