Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ! अंगावरची हळद निघण्यापुर्वीच नवरदेवाचा हृदय विकाराने मृत्यू


वडवणी //  लग्न झाल्यावर अंगावरची हळद निघण्यापुर्वीच नवरदेवाचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशोक सुग्रीव करांडे (वय-२७) असे या मृत्यू झालेल्या नवरदेवाची नाव असून तो बीड वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रहिवाशी होता. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक करांडे आज सकाळी नऊ वाजता बहिणीच्या मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी मोटार सायकलने जात होते. मात्र वडवणी गावाजवळ आल्यावर ते अचानक चक्कर येऊन मोटार सायकलवरून खाली पडले. त्यानंतर त्यांना उपचाराकरिता बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.
अशोक सुग्रीव करांडे यांचा विवाह अवघ्या ५ दिवसांपूर्वी म्हणजेच २१ मे ला माजलगाव तालुक्यातील खेरडा गावात लग्न झाले होते. 