संजिवनी कॉलनीत युवतीचा भरदिवसा खून
खामगाव // स्थानिक संजिवनी कॉलनीत एका २७ वर्षीय युवतीचा खून झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
कु. अश्विनी सुधीर निंबोकार(२७) असे खून झालेल्या युवतीचे नाव असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतक युवती स्थानिक सनी पॅलेस भागात राहणारी असल्याचे समजते. धारधार शस्त्राचे युवतीच्या चेहºयावर आणि पोटावर सपासप वार केल्यानंतर हल्ला करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लयानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून, पोलिस याप्रकरणी कसून शोध घेता...
युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
खामगाव// येथील संजिवनी कॉलनी परिसरातील एका शाळेनजीक युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध लागला असून, युवतीची हत्या केल्यानंतर या आरोपीने रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
युवतीच्या खून प्रकरणाशी धागेदोरे जुळत असलेल्या आरोपीचे नाव सागर निंबोळे रा. पातूर असे आहे. संजिवनी कॉलनीत शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कु. अश्विनी सुधीर निंबोकार(२७) या युवतीची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने शेगावच्या दिशेने पळ काढला. पोलिस मागावर असल्याचे समजताच, सागर निंबोळे याने रेल्वेतून उडी मारून घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांनी दिली.

Social Plugin