बीड // जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका चालकाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या गावात रविवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अनंत उर्फ बाळु निवृत्ती तळेकर (वय-३२) असे खून करण्यात आलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील हॉटेल सम्राटचे मालक अनंत उर्फ बाळू तळेकर यांना हॉटेल समोर चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या तळेकर यांनी उपचारासाठी बीड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी गावात समजताच मादळमोही परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मयत अनंत तळेकर वर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin