Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात ! पोलिस जीप आणि कारच्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू 8 जखमींमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश



 बीड // आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या धोंडे पेट्रोल पंपाजवळ पोलिसांची जीप आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर दोन पोलिसांसह कारमधील सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. हा अपघात आज मंगळवार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास  झाला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बाळासाहेब दादाराव देवगडे (वय-४५ रा. लाहूरी ता. केज) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर किशोर बाळासाहेब देवगडे (वय- २३), वसंत डांगे (वय- २५), सुमन वसंत डांगे (वय- २३, रा. कोल्हेवाडी ता. केज), सोनाली देवगडे (वय- २०, रा लाहूरी ता केज) यांच्यासह आर्यन आणि आराध्या ही दोन चिमुकली जखमी झाली आहेत. तसेच पोलीस जीप चालक हनुमंत बांगर, विठ्ठल नरवडे हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींवर आष्टी आणि नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत बाळासाहेब देवगडे हे मुळचे लाहूरी गावचे रहिवाशी असून सध्या ते डोंबिवली येथे वास्तव्यास होते. देवगडे हे आपल्या नातेवाईकांसोबत सोमवारी रात्री डोंबिवली येथून कारने (एमएच ०१ बीके ९२४९) त्यांच्या मुळ गावी निघाले होते. पहाटे पाचच्या सुमरास आष्टी पोलीस ठाण्यापासून एक किमी अंतरावर त्यांच्या कारची आणि पोलीस जीपची (एमएच २३ एफ १११७) समोरासमोर धडक झाली. यामध्ये बाळासाहेब देवगडे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल शहाने, पोलीस हवालदार गणेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळेकर, पोलीस हवालदार नवनाथ काळे, पोलीस नाईक पांडुरंग दराडे, अनिल राऊत यांनी घटनास्थळी येऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले