Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्टेट बॅंक ऑफ इंडियानं १ एप्रिलपासून बचत खात्या संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे केले बदल .


पुणे //    खातेदाराच्या खात्यात किमान रक्कम नसल्यास दंड अधिक जीसटी लागू होणार आहे.
बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियानं १ एप्रिलपासून बचत खात्या संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. देशात मेट्रो, शहरी, अर्ध शहरी आणि ग्रामीण अश्या चार विभागांमध्ये बचत खात्यात किमान रक्कम ठेवण्या संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार खातेदारास बचत खात्यात किमान रक्कम रुपये १००० ते ३००० ठेवावे लागणार आहेत.

खातेदाराच्या खात्यात किमान रक्कम नसल्यास दंड अधिक जीसटी लागू होणार आहे. बचत खात्यात किमान रक्कम नसल्या कारणाने गेल्या वर्षभरात अनेक खातेदाराना दंड बसला व बँकेने करोडो रुपयांची वसुली केली. त्यामुळे अनके खातेदारानी खाती बंद केली अथवा बदलली . बचत खात्यात किमान रक्कम किती असावी याबाबत स्पष्टता नव्हती त्यामुळे स्टेट बँकेने आता याबाबत तपशील जारी केले आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील खातेदाराना होणार आहे.

ग्रामीण भागातील खातेदाराना बचत खात्यात रुपये १००० , शहरी, अर्ध शहरी भागातील खातेदाराना रुपये २००० तर देशात मेट्रो शहरी भागातील खातेदाराना रुपये ३००० किमान रक्कम ठेवावी लागणार आहे . या किमान रक्कमे पेक्षा खात्यातील रक्कम कमी झाल्यास रुपये ५ ते १५ दंड व त्यावर जीएसटी अशी रक्कम एकूण दंड म्हणून भरावी लागणार आहे.