Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक घटना ! नगरजवळ अचानक कोयत्याने सपासप वार करून एका तरुणाचा निर्घृण खून



अहमदनगर // नगर तालुक्यातील अकोळनेर येथे मोटारसायकलवरुन आलेल्या चार हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

दिनेश गोरख दिवटे (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दिनेश हा बुधवारी रात्री नऊ वाजता त्याच्या घराजवळ उभा होता. याचवेळी चेहऱ्याला रुमाल बांधलेले मोटारसायकलवरून चार हल्लेखोर आले. त्यांनी अचानक दिनेश याच्यावर कोयत्याने हल्ला केला.  या चौघांनी इतका अचानक हल्ला केली की दिनेश प्रतिकार करु शकला नाही. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने दिनेशचा जागीच मृत्यु झाला. हल्ला केल्यानंतर ते चौघेही पळून गेले.

ही घटना समजताच ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे हे तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने अकोळनेर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी नगर तालुका परिसरात पथके रवाना केली आहेत. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही