@असा संदेश आला तर काय घ्यायची खबरदारी ? वाचा खालील टीप्स.
मुंबई // इन्कम टॅक्स रिफंडचा खोटा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा मेसेज फेक असून त्याद्वारे करदात्यांच्या बँक खात्यातील रक्कम लाटल्याच्या घटना घडत आहेत. यापासून सावधानता बाळगण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं याबद्दल एसएमएस आणि ईमेलद्वारे सर्व रजिस्टर्ड करदात्यांना जागरुक करीत आहे. संबंधित मेसेज आल्यानंतर अकाऊंट, पिन, ओटीपी, पासवर्ड आणि इतर आर्थिक माहिती शेअर करू नका असा संदेश आयकर विभागाकडून देण्यात येत आहे.
याबाबत आयकर विभागाने सांगितले आहे की कोणत्याही संदेशाद्वारे फोन, ईमेलद्वारे करदात्यांचा डेबिट, क्रेडिट पिन नंबर, ओटीपी, पासवर्ड मागितला जात नाही. डेबिट, क्रेडिट पिन नंबर, ओटीपी, पासवर्ड मागणारा संदेश तुम्हाला आला तर त्याला उत्तर देऊ नका असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.
फिशिंग मेल कसा ओळखायचा ?
@— इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलंय की फिशिंग मेल सावधपणे ओळखा.
@— ज्या आयडीवरून हा मेल आलाय त्याला नीट पाहा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी मिळतं जुळतं नाव असेल. बऱ्याचदा स्पेलिंग मध्ये थोडाफार फरक करून असे ई-मेल्स पाठवले जातात.
@— त्याचं नीट स्पेलिंग तपासा.
— इन्कम टॅक्सच्या नावात आणि त्या ईमेलमध्ये बरंच साधर्म्य असेल.
फिशिंग मेल मिळाल्यावर काय घ्याल खबरदारी
@— अशा प्रकारच्या मेल्सची अॅटॅचमेंट उघडू नका
— मेलमधल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका
@— चुकून तुम्ही लिंकवर क्लिक केलंत तरीही त्यात बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याबद्दलची माहिती भरू नका.
इन्कम टॅक्स रिफंडची संख्या जास्त वाढलीय. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ज्या रिटर्नमध्ये शंका वाटते, त्यांची तपासणी करतंय. लोकांची कमाई वाढतेय, पण त्यानुसार इन्कम टॅक्स भरला जात नाहीय. उलट रिफंडचे दावे वाढतायत. रिफंडच्या दाव्यात संदिग्धता आढळली की त्याची तपासणी केली जातेय.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री शिवप्रसाद शुक्ला यांनी राज्यसभेत सांगितलं की संदिग्ध टॅक्स रिफंडची संख्या वाढतेय. अशा दाव्यांची तपासणी होतेय.
ही संख्या
२०१८-१९ मध्ये २०, ८७४
२०१७-१८ मध्ये ११,०५९
२०१६-१७ मध्ये ९,८५६ राहिलीय
Social Plugin