Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परभणीत पुन्हा हत्या.... शस्त्रास्त्रांनी एकाला जिवंत ठेचून खून .



पाडव्या निमित्त लागणाऱ्या साखरेच्या घाटींचे दुकान लावण्यावरून झाला होता वाद. सावत्र भावांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू.
  - डोक्यात रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून केला खून.
परभणी // गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी विक्रीचे दुकान लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून भर बाजारात खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. एकाच आठवड्यात सलग दुसऱा खून झाल्याने परभणीत मात्र खळबळ उडाली आहे.

सोमनाथ लक्ष्मण आळणे (भोई गल्ली, परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर खून करणाऱ्यांमध्ये त्याच्या सावत्र भावांचा समावेश आहे. सचिन आळणे व नितीन आळणे अशी दोघांची नावे आहेत.

सोमनाथ आणि त्याच्या दोन भावांमध्ये गुजरीबाजार भागात गाठी विक्रीचा गाडा लावण्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी दोघा भावांनी मिळून त्याच्यावर भर बाजारात कोयत्याने वार करून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तर याप्रकरणी नानलपेठ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

एकाच आठवड्यात सलग दुसऱा खून झाल्याने परभणीत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपुर्वी नगरसेवकाचा अशाच प्रकारे खून करण्यात आला होता.