नाशिक // तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. दि. 29 जानेवारी रोजी तक्रार नोंदविण्यात आली तसेच त्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये महिला तलाठी या लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. सात-बारा उतार्यावर नावाची नोंदणी करण्यासाठी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 हजार रूपयाची लाच खासगी व्यक्तीव्दारे घेणार्या महिला तलाठ्यास आणि खासगी व्यक्तीस नाशिकच्या अॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई करण्यात आली आहे.
भाग्यश्री रावसाहेब धायतडक (तलाठी, मुंडेगांव, घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) आणि हिरामण गंगाराम खोकले (रा. सोनज, पो. वाघेरे, जि. इगतपुरी, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावात शेतजमिन खरेदी केलेली आहे. त्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर तक्रारदाराचे नाव लावायचे होते. त्यासाठी तक्रारदाराने मुंडेगाव येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. नाव नोंदणी करून देण्यासाठी महिला तलाठी भाग्यश्री धायतडक यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
अॅन्टी करप्शन विभागाने आज (मंगळवार) मुंडेगाव येथील तलाठी कार्यालयात सापळयाचे आयोजन केले. त्यावेळी खासगी व्यक्ती हिरामण खोकलेने महिला तलाठी भाग्यश्री धायतडक यांच्या सांगण्यावरून सरकारी पंचासमक्ष 3 हजार रूपयाची लाच स्विकारली. दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदवावी अन्यथा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Social Plugin