बीड // सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार 39-लोकसभा मतदारसंघात गुरुवार, दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदानाच्या दिवशी बीड लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 10 मार्च, 2019 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे, त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी त्या लोकसभा मतदारसंघामध्ये परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (1881) चा 26 कलम 25 खाली सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. .
ही सार्वजनिक सुट्टी बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदान कामासाठी त्या-त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील, त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही लागू राहील, असे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानूसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी,बीड यांनी कळविले आहे.
Social Plugin