Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रस्ता कामाची पाहणी करणारे बीड बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांना अज्ञात वाहनाने उडवले ; 2जण गंभीर जखमी


परळी वैजनाथ  // परळीजवळील पांगरी कँम्प रस्त्यावर अज्ञात वाहनाने कारला धडक दिली. यामध्ये यामध्ये बीड येथील बांधकाम विभागाचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर परळीत प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज दि.२ रोजी दुपारी 1.15 वा. सुमारास घडली.

बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व कर्मचारी यांची एक टीम रस्ता कामाची पाहणी करण्यासाठी बीडहून परळीकडे येत होती. यावेळी पांगरी कँम्प  रस्त्यावर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या  अज्ञात वाहनाने त्‍यांच्या कारला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की कारचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात कारमधील चारही जण अतिशय गंभीर जखमी झाले असून, दोघांना खूप मार लागला आहे. जखमींमध्ये निलप्पा मंगलेश्वर उंबरजे (वय 29) रा. औजमंदरू ता. दक्षिण सोलापूर, पवन संजय लड्डा वय 25 रा. एलआयसी काॅलनी लातुर, लखन सर्जेराव विधाते वय 30 वर्षे रा. संभाजीनगर बीड, संतोष दिगंबर आनेराव (वय 44 वर्षे) रा. श्रीरामनगर बीड यांचा समावेश आहे.

अपघातग्रस्तांना नागरीकांनी सतर्कता दाखवत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींना अपघातात भयानक मार लागला असून यातील दोन जण अत्यवस्थ आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर लटपटे, डॉ. माले, डॉ. कुरमे यांच्यासह आरोग्य कर्मचारी वर्ग सचिन मुंडे, मनिषा महाडकर, सचिन मुंढे, वर्षा उगलमुगले, प्रशांत कराड, ऋषिकेश मानवतकर, शेख सादेक, शिवराज कांबळे, राज तपसे, बनसोडे मामा, कातकडे मामा, ऊमेश शिरोळे, अयोध्या भंडारवाड आदींनी तत्परतेने या जखमींवर उपचार केले.प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.