Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक घटना! पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने शिक्षकाने दोन चिमुकल्या मुलींनसह केली आत्महत्या .


 चंद्रपूर // पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने शिक्षकाने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून ते फोटो पत्नीला व्हाटस् अप करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपुर येथे समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पत्नीची चौकशी करण्यात येणार आहे. ऋषिकांत कदुपल्ली असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पेशाने शिक्षक असलेले ऋषिकांत कदुपल्ली हे बल्लारपूर येथे कुटुंबासह राहण्यास आहे. त्यांची पत्नी आणि दोन मुलीं असा त्यांचा परिवार आहे. सुखी संसार सुरु असतानाच त्याच्या पत्नीचे एका ड्रायव्हर सोबत प्रेमप्रकरण जुळले होते. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपुर्वीच ती त्या ड्रायवर सोबत ती पळून गेली. त्यामुळे एकट्या पडलेल्या ऋषिकांतला याचा जबर मानसिक धक्का बसला.

व्यथित झालेल्या ऋषिकांतने दोन्ही मुलींना आधी गळफास लावला. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे त्याने मुलींना गळफास दिल्यानतंर त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हाटसअप केले आणि स्वत: देखील आत्महत्या केली. पत्नीला व्हाटसअपवर फोटो मिळाल्यावर तिने हा प्रकार वडीलांना सांगितला. पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. ऋषिकांतच्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस त्याच्या पत्नीची चौकशी करणार आहे. असे सांगण्यात आले आहे.