सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह ! निर्माण झाले आहे .
परळीत // परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा विद्यमान नगरसेविकचे पती पांडुरंग गायकवाड (तात्या) रविवारी राञी 2 वाजण्याच्या सुमारास आज्ञात आरोपीच्या हल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयत पांडुरंग गायकवाड यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून सहा संशयीत आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी दिली. या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली असून शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, रेल्वे उड्डाण पुलाखाली रात्री १ ते २ च्या दरम्यान १० ते ११ जणांनी लाठ्या, काठ्या व तलवारीने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्यावर हल्ला केला. या हल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयताचा मुलगा केशव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी यांनी सहा संशयीत आरोपींनावर कलम १४७, १४८, १४९, ३०२ भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin