स्टेपिंग स्टोन स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात साजरा झाला .
परळी // जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करत आणि त्यांच्याप्रती सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. तसेच अर्थ, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थही हा दिवस साजरा केला जातो.दरवर्षी जगभरात ८ मार्च हा ' जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या महिला दिनाच्या निमित्ताने येथील स्टेपिंग स्टोन स्कूल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा आकर्षण ठरली.
यावेळी महिलांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकणारी मनोगते मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमास शाळेचे शिक्षकवृंद दीप्ती राईचं , सारिका मानकर ,शैला पोहनेरकर , अंजली नानवटे,निकिता ढवने, हिना सय्यद ,क्षितिजा देशमुख , रेणुका मुळी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
Social Plugin