परळी// शहरातल्या कृष्णा नगर भागातुन एका युवकाकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .
संभाजीनगर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सचिन सानप बाबासाहेब, विलास देशमुख आचार्य यांनी ही कारवाई केली.
दुपारी 4 च्या सुमारास भेटलेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृष्णा नगर भागातील एका 20 वर्षीय युवकाला स्टीलच्या गावठी पिस्तुल (4 m.m.) आणि तीन जिवंत काडतुसासह ताब्यात घेण्यात आले.त्याच्यावर गु. र.नं.87/19 कलम 3/25 arms act आणि 135 म.पो.का.प्रमाणे संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.आर.माने मॅडम करत आहेत.
Social Plugin