Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लोकसभा निवडणूकीसाठीराष्ट्रवादी काँग्रेस कडून बीड लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर

बीड // गुरुवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवार निवडीसाठी बैठक झाली होती. या बैठकीस माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा, संदीप क्षीरसागर उपस्थित होते. यात गेवराईचे माजी आ. अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली असली तरी अमरसिंह पंडित हेच प्रबळ उमेदवार ठरू शकतात, असा चर्चेचा सूर होता. दोनच नावे चर्चेला आल्यामुळे गुरुवारी सायंकाळी जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत बीडचा उमेदवार असेल, असे वाटत होते. परंतु पक्षाच्या पहिल्या यादीतील ११ उमेदवारांत बीडचे नाव नव्हते.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठीराष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात बीड लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून उमेदवारीवरून सुरु असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

यानंतर आज दुपारी पक्षाने राज्यातील पाच जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये बीडच्या जागेसाठी पक्षाने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी जिल्हाध्यक्ष सोनवणे यांची थेट लढत होईल