Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सतराव्या लोकसभा निवडणूक जाहीर..निवडणुका सात टप्प्यात होणार !



मुंबई // सतराव्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज (रविवार) करण्यात आली. आगामी निवडणुका सात टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याची निवडणूक ११ एप्रिल तारखेला होणार असून त्याची अचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. तर निवडणूकीचा निकाल २३ मेला जाहीर होणार असल्याची माहिती राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.
निवडणुकांच्या तारखा नेमक्या कधी जाहीर होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. या निवडणुकांची घोषणा ८ मार्चलाच होईल असा अंदाज बांधण्यात येत होता. पण अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीच्या तारखा जाहिर केल्या.
२०१४ च्या तुलनेत यांदा ७ कोटी मतदार वाढले आहेत. देशातील मतदारांची संख्या ९० कोटींच्या घरात पोहचली आहे. १८ ते १९ वयोगटातील तरुणांची संख्या दीड कोटी असून १ कोटी ६० लाख सरकारी नोकरदार निवडणूकीचा हक्क बजावणार असल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले. तसेच देशात १० लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो दिसणार आहे. मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करणार असल्याचेही अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उमेदवाराला आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे आवश्यक आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. ईव्हीएम मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेण्यात येणार आहे.
पहिला टप्पा- ११ एप्रिल
दुसरा टप्पा- १८ एप्रिल
तिसरा टप्पा- २३ एप्रिल
चौथा टप्पा- २९ एप्रिल
पाचवा टप्पा- ६ मे
सहावा टप्पा- १२ मेमहाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अन्य कोणत्या राज्यात, किती टप्प्यांत आणि कधी मतदान होणार आहे याचा आढावा...

अंदमान आणि निकोबार - एक टप्पा - 11 एप्रिल

आंध्र प्रदेश - एक टप्पा - 11 एप्रिल

अरुणाचल प्रदेश - एक टप्पा - 11 एप्रिल

आसाम - तीन टप्पे - 11, 18, 23 एप्रिल

बिहार - सात टप्पे - 11, 18, 23 एप्रिल आणि 6, 12, 19 मे

चंदीगड - एक टप्पा - 19 मे

छत्तीसगड - तीन टप्पे - 11, 18, 23 एप्रिल

दादरा आणि नगर हवेली - एक टप्पा - 23 एप्रिल 

दमण आणि दीव - एक टप्पा - 23 एप्रिल 

दिल्ली - एक टप्पा - 12 मे

गोवा - एक टप्पा - 23 मे

गुजरात - एक टप्पा - 23 मे

हरयाणा - एक टप्पा - 12 मे

हिमाचल प्रदेश - एक टप्पा - 19 मे

जम्मू आणि काश्मीर - पाच टप्पे - 11, 18, 23, 29 एप्रिल आणि 6 मे


झारखंड - चार टप्पे - 29 एप्रिल आणि 6, 12, 19 मे

कर्नाटक - दोन टप्पे - 18, 23 एप्रिल

केरळ - एक टप्पा - 23 एप्रिल

लक्षद्वीप - एक टप्पा - 11 एप्रिल

मध्य प्रदेश - चार टप्पे - 29 एप्रिल आणि 6, 12, 19 मे

महाराष्ट्र - चार टप्पे - 11, 18, 23, 29 एप्रिल

मणिपूर - दोन टप्पे - 11, 18 एप्रिल

मेघालय - एक टप्पा - 11 एप्रिल 

मिझोराम - एक टप्पा - 11 एप्रिल 

नागालँड - एक टप्पा - 11 एप्रिल

ओडिशा - चार टप्पे - 11, 18, 23, 29 एप्रिल

पुदुचेरी - एक टप्पा - 18 एप्रिल 

पंजाब - एक टप्पा - 19 मे

राजस्थान - दोन टप्पे - 29 एप्रिल, 6 मे

सिक्कीम - एक टप्पा - 11 एप्रिल 

तामीळनाडू - एक टप्पा - 18 एप्रिल

तेलंगणा - एक टप्पा - 11 एप्रिल 

त्रिपुरा - दोन टप्पे - 11, 18 एप्रिल

उत्तर प्रदेश - सात टप्पे - 11, 18, 23 एप्रिल आणि 6, 12, 19 मे

उत्तराखंड - एक टप्पा - 11 एप्रिल 

पश्चिम बंगाल - सात टप्पे - 11, 18, 23 एप्रिल आणि 6, 12, 19 मे