Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुडन्यूज ! परळी-पिंपळा रस्त्याचे काम पुर्ण करण्याकडे लक्ष ठेवले जाईल -खासदार प्रितम मुंडे

परळी-पिंपळा रस्त्यासाठी निधी वाढवून देण्याचा केंद्रीय रस्ते व वाहुतूक मंत्री नितीन गडकरी 

 काम विक्रमी वेळेत पुर्ण करण्याकडे लक्ष ठेवले जाईल 


बीड जिल्ह्याच्या खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी परळीकरांना दिला विश्वास ; रास्ता रोको अखेर मागे

काम रखडणा-या  कंत्राटदाराला सर्वांसमोर झापताच परळी-पिंपळा रस्त्याचे काम लागलीच सुरू !

परळी //परळी-पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या ठोस आश्वासनानंतर दुपारी मागे घेण्यात आले. दरम्यान, काम रखडून ठेवणा-या कंत्राटदाराला खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांसमोर चांगलेच झापल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने लगेचच रस्त्याचे काम सुरू करण्याचे मान्य करून, तशी लगबगही त्याने सुरू केली आहे. 

   परळी-पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाचे काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सातत्याने रखडत असून त्याचा फटका सर्व सामान्य रहिवाशांना बसत आहे, हे काम तातडीने सुरू करून रहिवाशांची धुळीच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी करत स्थानिक रहिवाशांनी आज सकाळी रास्ता रोको केला होता. रहिवाशांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेत    खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी त्याठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांचे गा-हाणे शांतपणे ऐकून घेतले. रस्त्याचे काम रखडल्यामुळे धुळ आणि प्रदुषणाने रहिवाशांना होणारा त्रास मी समजू शकते, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते असे सांगून त्यांनी  जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग असो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हयात आणला आहे. सर्व ठिकाणी रस्ते झाले पण इथला रस्ता रखडला, याला सर्वस्वी कंत्राटदार जबाबदार आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात येईलच पण त्यापूर्वी रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेवू. आपण आंदोलन करून स्वतःला त्रास करुन घेवू नका असे आवाहन त्यांनी केले. 

*कंत्राटदाराला झापताच काम सुरू* 
-------------------------------
खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी यावेळी संबंधित कामाच्या कंत्राटदाराला बोलावून घेऊन सर्वांसमोर त्याला झापले, एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव अतुल देऊळगांवकर यांना  फोन केला व रहिवाशांना ऐकू येण्यासाठी स्पीकर ऑन करून सर्व परिस्थिती कथन केली. देऊळगांवकर यांनी यावेळी बोलतांना ना पंकजाताई मुंडे हया रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांनी काम रखडणा-या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सांगितले आहे, त्यानुसार कारवाई तर होईलच शिवाय ना. पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार  कामाचे बजेट वाढवून देण्यात येत असल्याचेही सांगितले. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन करणा-या महिला व पुरुषांनी आपला रास्ता रोको मागे घेतल्याने वाहतूक पुर्ववत सुरू झाली. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, नगरसेवक पवन मुंडे यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
••••