तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे; प्रशासनाचे आवाहन
परळी // प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रविवार, दि.२४ फेब्रुवारीला शुभारंभ करण्यात येत आहे. यानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी १०.३० वाजता गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथून या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यातही या योजनेच्या शुभारंभाच्या अनुषंगाने प्रशासकीय कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परळी तहसिल कार्यालयातही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानिमित्त परळी तहसिल कार्यालयात आज रविवार, दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संबंधीत योजनेबाबत इतंभूत माहीती देण्यात येणार असून, प्रधानमंत्र्यांच्या मन कि बात कार्यक्रमांतर्गत संवादही होणार आहे. विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin