औरंगाबाद // ज्यांना एवढी वर्षे सत्ता असताना विकासाचे परिवर्तन घडवता आले नाही ते आता स्वार्थासाठी सत्ता परिवर्तन यात्रा काढत आहेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेच्या प्रश्नांवर संघर्षयात्रा काढली ती वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध सामान्यांमध्ये असलेल्या रोषाला वाचा फोडण्यासाठी पण आज काही मंडळी केवळ सत्ता मिळवण्यासाठी यात्रा काढत आहेत. सत्तेशिवाय ते राहूच शकत नाहीत. असा हल्लाबोल करून येणा-या निवडणूकीत पाया मजबुत असलेले भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आहे असा दृढ विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.
औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्हयाच्या शक्तीकेंद्र प्रमुख व बूथप्रमुखांच्या क्लस्टर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. त्या म्हणाल्या,राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही तळागातील सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवल्या आहेत, त्याचा प्रसार आणि प्रचार जनतेपर्यंत पोहोचवा. आज राज्यातील प्रत्येक व्यक्तीला भाजप सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ मिळत आहे आणि म्हणून विरोधकांनी आमची धास्ती घेतली आहे. आज परळीत जे समारोप सभा घेत आहेत त्यांचा राजकारणातून कायमचा समारोप केल्या शिवाय थांबणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीड – परभणी -जालना- औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्व जागा जिंकून विरोधकांना झेंडा फडकवण्याची संधी मिळू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Social Plugin