परळी//
परळीच्या इतिहासात या मैदानावर आज दुसऱ्यांदा सभा होत आहे. पहिली सभा स्व अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळी पंतप्रधान होते तेव्हा झाली होती आणि आता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिवर्तन यात्रेची सांगता सभा होत आहे
जे लोक आज स्वतःला स्व गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकीय वारस सांगत आहे त्यांच्या सरकार घोषणा केली की स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नावे उसतोड कामगार महामंडळ बनवले जाईल. मी दूरबीन लावून सोधलं पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ काही सापडले नाही, ते महामंडळच रद्द केले. हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा अपमान आहे
जे लोक आज स्वतःला स्व गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकीय वारस सांगत आहे त्यांच्या सरकार घोषणा केली की स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नावे उसतोड कामगार महामंडळ बनवले जाईल. मी दूरबीन लावून सोधलं पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ काही सापडले नाही, ते महामंडळच रद्द केले. हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा अपमान आहे
मुख्यमंत्री काल विवाह सोहळ्यानिमित्त इथे आले होते. मला वाटलं ते नवी जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी इथे आले होते पण परिवर्तन यात्रेच्या सभेने त्यांच्या काळजात कळ आणली आहे आणि त्यांनी परिवर्तनावर टीका केली. तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप या परळीतून होईल
मुख्यमंत्र्यांनी काल छगन भुजबळ साहेबांवर टीका केली, ते म्हणाले ती भुजबळ यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही जामिनावर सुटले आहात. मी मुख्यमंत्र्यांना सांगू ईच्छीतो की तुम्ही मुख्यमंत्री असाल मात्र आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता ? आधी १६ मंत्र्यांच्या जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे त्याची चौकशी करा
योगायोग बघा कसा आहे, या परिवर्तन यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होऊन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आशिर्वाद घेऊन झाली होती आणि सांगता शिवशंभू वैजनाथाच्या चरणी होत आहे.
माझ्या ...म्हणाल्या की, राष्ट्रवादीचा समारोप करू, राष्ट्रवादी काँग्रेस संपवने चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या बघू कोण संपतंय
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा यावेळी आपल्या एकत्र काम करायचे आहे.
◆ आज मी धनंजय मुंडे म्हणून नाहीतर प्रकाश दादा सोळंके, अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे म्हणून बोलतोय.
◆ हे तेच ऐतिहासिक मैदान आहे जिथे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी सभा घेतली होती त्यानंतर परळीच्या इतिहासात दुसऱ्यांदा शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे.
◆ १० जानेवारी रोजी परिवर्तन यात्रेची सुरूवात रायगडावरून शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करून झाली आणि आज परळीच्या शिव शंभू प्रभू वैद्यनाथाच्या चरणी सांगता होत आहे.
◆ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मस्तवाल सत्तेचा समारोप येथेच होईल काळजी नसावी. आम्ही जर रायगडावरून शिवाजी महाराजांच्या चरणी मुजरा करून परिवर्तन यात्रा सुरू केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात का कळ उठली असावी.
◆ बीडच्या दबंग खासदार म्हणवणाऱ्या नेत्यांना इथून एक जिल्हा परिषदेच्या सदस्याला निवडून आणता येत नाही व स्वतःला मोदींपेक्षा इतक्या मोठ्या समजत आहेत की अमित शहादेखील त्यांच्यापुढे कमी आहेत असे त्या भागवत आहेत.
◆ बारा ज्योतिर्लिंगांपैकी इथल्या वैद्यनाथाचा उल्लेख अजूनही केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये नाही.
◆ बीड जिल्ह्यातील ७८ सिंचन प्रकल्प रखडल्याने ऊसतोड मजूर मोठया संकटाला सामोरे जात आहेत याला इथल्या पालकमंत्री जबाबदार आहेत.
◆ इथले थर्मलचे सर्व संच बंद पाडले जात आहेत तेव्हा इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी भगिनी काय करत आहेत?
◆ केवळ स्व. मुंडे साहेबांचे नावं घेत भावनिक राजकारण करत असतात. इथली जनता गरीब व त्यांचा स्वतःचा विकास सुरू आहे.
◆ निवडणूक हरल्यावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शरद पवारांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले.
◆ छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री धमकी देत असतील तर तडीपार अमित शहांच काय? तुमचं नावं खरंच देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असेल तर आम्ही १६ मंत्र्यांवर राज्याच्या दोन्ही सभागृहात पुराव्यानिशी केलेले आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी.
◆ Photo from 🤴🏻 आगामी निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान करून छगन भुजबळ यांना भाषणासाठी आमंत्रित केले.
निर्धारपरिवर्तनाचा_यात्रा दरम्यान चे भाषण ....*छगन भुजबळ लाईव्ह*
◆ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९८५ साली शाळेत होते तेव्हा मी मुंबईचा महापौर व आमदार होतो.
◆ बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना बेळगाव असो कारवार असो मी लाठ्या काठ्या खाल्या, अनेकदा जेलमध्ये गेलो त्यामुळे मला तुरुंगवासाची धमकी दाखवू नका.
◆ मला फडणवीस नकलाकार म्हणतात त्यांनी सांगावं त्यांना माझं कोणतं वक्तव्य खटकलं?
◆ पुलवामा हल्ला झाल्यावर काही तासांत मोदी, योगी सत्तेसाठी मतांची भीक मागत होते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर युतीच्या वाटाघाटी करत आहेत. याचवेळी प्रियंका गांधींनी त्यांची पत्रकार परिषद रद्द केली याचा अर्थ परिपक्व कोण?
◆ "पाकिस्तानमे इंदिराजीवाला सन्नाटा चाहीए" असे म्हणत जनतेच्या भावनांना घातला हात.
◆ भाषणा दरम्यान छोटया छोट्या हिंदी-मराठी कवितांचा वापर.
◆ दादरीच्या अखलाखवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देशात उपस्थित झालाय.
◆ पांढरकवड्याला मोदींच्या सभेत पाण्याअभावी एका शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला कारण तीच्याजवळची पाण्याची बाटली मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांनी काढून घेतली. तुमचा छप्पन्न इंचाचा सीना एका मुलीला का घाबरतो?
◆ सर्व संवैधानिक यंत्रणा या सरकारने संपवण्याचा घाट घातला आहे.
◆ नोटबंदी, राफेलवरून सरकारला धारेवर धरले.
◆ माध्यमकर्मींचे हे सरकार दमन करत आहे.
◆ मोदींची चहा विकण्यावरून नांदेड येथे केलेल्या नकलेची परळीतसुद्धा पुनरावृत्ती.
*घर घर नाली, घर घर गॅस*
*वाह रे शासन तेरा खेल, न्याय मांगा हो गई जेल*
◆ महाराष्ट्र सदन प्रकरणी स्वतःवरील आरोपांचे भुजबळांकडून खंडण.
◆ मोदी सरकारच्या सर्व योजना व आश्वासनांची उजळणी करून त्या फेल आहेत सोबत आता राफेल.
◆ आता पैसे पिशवीत नेऊन खिशात सामान आणावे लागेल. पेट्रोल मोदींच्या वयापेक्षा महाग झाले आहेत. पेट्रोलचं नावं बदलून पं. दिनदयाल उपाध्याय तरल पदार्थ करू नये म्हणजे मिळवलं.
◆ वो मंदिर नहीं सरकार बनाना चाहते है,
वो देश मे फिरसे कितने मूर्ख हैं ये आजमाना चाहते है।
◆ मोदी योगी का एकही नारा,
ना घर बसा हमारा; ना बसने देंगे तुम्हारा।
Social Plugin